पूजनीय आबामहाराजांचा जन्म चित्पावन ब्राह्मण माता-पित्यांच्या पोटी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात बाकाळे ह्या खेडेगांवात झाला. कोकणातील अनेक खेड्यांसारखे हे एक गांव. आंब्या - फणसांच्या झाडांची गर्द झाडी, जवळच खाडी, तुरळक लोकवस्ती असा हा गांव. पूजनीय आबामहाराजांचा जन्म दिन मंगळवार, जन्म तिथी पौष वद्य ५ शके १८३४ आणि जन्म तारीख २८ जानेवारी १९१३.
वयाच्या साधारण ६ व्या वर्षीच त्यांना आईचा वियोग सहन करावा लागला. व इथे मृत्यूची पहिली ओळख झाली. घरातील वडीलधऱ्यांनी 'तुझी आई देवाकडे गेली' असे सांगितले. पण त्यांच्या मनात विचारांची गर्दी केली होती. देवाकडे म्हणजे कोठे ? परत का येणार नाही ? मुळात गेलीच का ? असे अनेक प्रश्न होते. ज्यांची उत्तरे मोठ्यांकडेही नव्हती. सामान्यात:
सर्वच जणांना बालपणी जवळच्या आप्तांच्या मृत्यूनंतर हे प्रश्न पडतात. पुनर्जन्म घेऊन आलेले असतात त्यांच्या पुढील वाटचालीची, हे प्रश्न म्हणजे बीजच असतात. देव म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय आणि मी म्हणजे कोण ? ह्या प्रश्नांभोवतीच तर सर्व अध्यात्मज्ञान गुंफलेले आहे. बाल वासुदेवाच्या मनात हे प्रश्न कायमच राहिले आणि पुढे एकीकडे व्यावहारिक जीवन जगत असतानाच मनात या बीजांना अंकुर फुटले. वाढत्या व्यावहारिक जीवनाचे रोपटे झाले आणि बुद्धीचे, तपाचे, अभ्यासाचे खत मिळून त्याचा 'वेलू गगनावरी.' वडिलांनी दुसरा विवाह केला. सावत्र आई घरात आली आणि वासुदेवाचे बालपण संपले. प्राथमिक शिक्षण गावातल्या शाळेतच झाले.
त्याच काळात घरात काही कुरबुरी झाल्या. मन विषण्ण झालं गावातल्या शंकराच्या देवळात जाऊन बसायची सुरुवात झाली. बराच वेळ घरी दिसले नाहीत की कोणीतरी येऊन शोधून घरी घेऊन जात असे.
प्राथमिक शिक्षण संपले व माध्यमिक शिक्षणाकरिता राजापूरच्या हायस्कूलमध्ये त्यांचे नाव घातले. रोज बाकाळे ते राजापूर असे पाच कि.मी. अंतर चालावे लागे. वाटेत हनुमानाचे मंदिर होते. जाता-येता ते त्याचे दर्शन घेत, त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव न्याहाळीत. केल्या आनंदी भाव दिसे, तेव्हा दिवस आनंदात जाई. तर केव्हा हनुमंताच्या चेहेऱ्यावर उदास भाव दिसत तेव्हा दिवशी काही ना काही अप्रिय घटना घडत. पण देवावरची निष्ठा दृढ होत होती.
पूजनीय आबामहाराजांचे वडील मुंबईला अकाउंटंट जनरलच्या ऑफिसात होते. त्यांनी मुंबईला गिरगांवातील माधवबाग निवासी चाळीत बिऱ्हाड केले व इ.स. १९२४ ते १९२५ दरम्यान पूजनीय आबामहाराज शिक्षणाकरिता मुंबईला दाखल झाले. मॅट्रिकपर्यंतचे त्यांचे शिक्षण मुंबईतच आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत झाले.
१९२९ साली मॅट्रीक झाल्यावर थोड्याच काळात वडील वारले. व एक सख्खी बहीण, भाऊ व सावत्र आई आणि सावत्र भावंडे यांचा भार पूजनीय आबामहाराजांवर पडला. त्यांनी मनात कोणताही दुजाभाव न बाळगता सख्या नात्याप्रमाणे सर्वांची काळजी घेतली.
मॅट्रीकनंतर काही काळ पूजनीय आबामहाराजांनी बाकाळे येथे आपल्या गावी शिक्षक म्हणून काम केले. १९३३ साली त्यांना मुंबईस अकाउंटंट जनरलच्या ऑफिसात नोकरी मिळाली. ह्या ठिकाणी त्यांनी शेवटपर्यंत नोकरी केली. स्वतःच्या हुशारीवर परीक्षा देत देत ते उप-मुख्य लेखा परीक्षक (महाराष्ट्र) या हुद्यावर पोहोचले.
वयाच्या २१ व्या वर्षी पूजनीय आबांचा विवाह झाला. सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ, शीवच्या आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य, वैद्य पंचानन श्री. अभ्यंकर शास्त्री यांची एकुलती एक कन्या सौ. गंगूबाई हिस वधू नेमस्त केली होती.
श्री. अभ्यंकर यांचे अंगात एका पीराचे वारे येत असे. त्या पीराने 'या मुलालाच तुझी मुलगी दे, त्यातच तिचे हित आहे', असे सांगितले व म्हणून हा विवाह झाला.
पूजनीय आबामहाराज जेव्हा नोकरीला लागले तेव्हा मुंबई राज्य व नंतर महाराष्ट्र व गुजरात यांचे संयुक्त राज्य होते. ह्यामुळे नोकरीतील नियमानुसार ते गुजराती भाषा शिकले. नगरपालिका, जिल्हा परिषदा, शिक्षण खाते, यांचे हिशोब तपासण्याचे काम त्यांच्याकडे होते, त्यामुळे त्यांना निरनिराळ्या ठिकाणी हिंडावे लागे.
ह्या सर्व भ्रमंतीच्या काळात नैसर्गिकरित्या असलेली देवभक्ति चालूच होती. पूजनीय आबामहाराजांना कठोर साधना व तपश्चर्या करण्याची जी बालपणापासून ओढ होती ती ह्या पुढील काळात जास्त तीव्र झाली व म्हणून ह्यापुढील १९४७ पर्यंतचा कालखंड हा त्यांच्या आयुष्यातील एक साधना कालखंड म्हणून महत्त्वाचा ठरतो. त्याचा परिचय पुढील प्रकरणांतून होईल.
परमपूजनीय श्री वासुदेव गोपाळ तथा आबामहाराज परंपजे यांचा हा चरित्र ग्रंथ आपल्या हाती देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
पूजनीय आबा महाराजांनी देहत्याग करून सुद्धा एकतपाचे वर काल निघून गेला. त्या दृष्टीने हा ग्रंथ प्रसिद्ध होण्यास खूपच उशीर झाला आहे.
पूजनीय आबा महाराजांचे वाङ्मय वाचून तसेच येथील श्रीज्ञानदेव स्मृतिमंदिरास (पूजनीय आबामहाराज परंपजे साधनाश्रमास) भेट देऊन प्रभावित झालेल्या मंडळींना पूजनीय आबामहाराजांचे चरित्र वाचण्याची उत्सुकता असे, पण आम्हाला त्यांची ती इच्छा पुरी करता येत नव्हती.
संतांचे चरित्र समुद्रातील बर्फाच्या डोंगरासारखे असते. फक्त आठवा हिस्सा पाण्यावर, बाकी सात भाग पाण्याखाली. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की, 'संतांचं मोठेपण संत झाल्यावरच कळणार नाही.' त्यांतही पूजनीय आबामहाराजांनी ज्ञानेश्वरीतील इतर अनेक ओव्यांच्या जोडीने "अलौकिक न व्हावे लोकांप्रति" आणि "कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोषी होआवे" या दोन ओव्या केवळ अनुभवल्या नव्हत्या तर ते त्यांचे जन्माचं व्रत झालं होतं. असे सत्पुरुष त्यांच्या जीवनात खोलवर पोचता येईल अशा पाऊलखुणा कुठे उमटून थेट नसल्याने, त्यांचं चरित्र लिहिणं तर आणखीनच अवघड.
पूजनीय आबामहाराजांच्या सहवासात आलेले काही मंडळींकडून मिळालेली माहिती एकत्रित करून हा ग्रंथ सिद्ध केला आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे लिखाण कोण प्रतिष्ठितश अगर व्यावसायिक लेखकाने केले नसून आमच्या
संस्थेच्या कार्यासाठी देणगी देण्यासाठीची माहिती आणि फॉर्म.
संपर्क साधण्याचे तपशील: पत्ता, फोन नंबर, ईमेल.
येथे लाईव्ह दर्शनाचा व्हिडिओ एम्बेड केला जाईल.